Mangesh Sports XI
1.0
मंगेश स्मृती स्पोर्टस ऍप कै.मंगेश सिताराम कोंडेकर या खेळाडूच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आले आहे.
टेनिस क्रिकेट फार झपाट्याने बदलत आहे . वेगवेगळ्या माध्यमातून , वेगवेगळ्या स्तरांवर टेनिस क्रिकेटला उच्च दर्जा मिळत आहे.
निजामपूर विभागातील ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर सन१९८६ पासून मौजे - बोरवली आणि टिटवे या खेड्यातील गावानी स्पर्धा नियोजनाला गाव पातळीवर दमदार सुरुवात केली.
विभागातील क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा , 'क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे' आणि तो वारसा ,इतिहास तसाच जपावा म्हणुनच विभागाची क्रिकेट संघटना असावी असा विचार क्रिडा प्रेमी आदरणीय कै.सितारामकाका रणपिसे (मौजे- मांजूणें ) यांच्या कल्पक बुद्धीत सुचला आणि ती कल्पना सत्यात उतरवावी म्हणून त्यांचे चिरंजीव उत्कृष्ट खेळाडू श्री जयेश सीताराम रणपिसे यांनी अनुभवी क्रिकेट खेळाडू यांना सोबत घेऊन सन २००६ मध्ये ता.माणगाव निजामपूर विभाग आंतरगाव क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली . बलाढ्य अशा बोरिवली संघाचे खेळाडू, श्री. जयेश कृष्णा साळवी यांना अध्यक्षपद देऊन गौरवण्यात आले.
आणि हळूहळू स्थानिक क्रिकेट आंतराष्ट्रीय पातळीवर खेळतात तसाच खेळता यावा म्हणून पुढील काळात विभागात खेळाडूंना व्यावसायिक व्यासपीठ मिळावे , त्याकरिता श्री महेश सीताराम कोंडेकर( प्रचंड क्रिकेट चा ध्यास आणि श्वास मानणारे , निस्सीम क्रिकेट भक्त ) यांनी एनपीएल ही स्पर्धा (आयपीएलच्या धर्तीवर ) मित्रांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न केली आणि ही स्पर्धा प्रत्येकाच्या जिवनात एक नवीन ऊर्जा देत आहे. नावलौकिकही खूप झाले.
इथेच न थांबता विभागातील स्थानिक खेळाडू आणि संघ यांचे लाईव्ह स्कोर अपडेट मिळावेत आणि स्वतःचा इतिहास भविष्यातही कायम रहावा, वाचता यावा व टेनिस क्रिकेटला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळावी याकरिताच मंगेश समूर्ती स्पोर्ट्स ऍप चा जन्म होतं आहे.
Features of the Mangesh Sports XI app:
ø Live score update
ø Tournament stats
ø Points table
ø Teams and players info
ø Gallery
ø Notification alerts
Celkové hodnocení
Pro hodnocení programu se prosím nejprve přihlaste
Souhrnné informace o Mangesh Sports XI